शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

सहकारातील कीड आधीपासूनच मुकुंदराव तापकीर : सांगली अर्बन बँकेत लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:17 IST

सांगली : १९७० च्या दशकात सहकार चळवळीला राजकारणाची कीड लागली. त्यामुळे सहकारात भ्रष्टाचार, गटबाजी वाढली.

सांगली : १९७० च्या दशकात सहकार चळवळीला राजकारणाची कीड लागली. त्यामुळे सहकारात भ्रष्टाचार, गटबाजी वाढली. या काळात चळवळीला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे काम लक्ष्मणराव इनामदार यांनी केले, असे प्रतिपादन सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. मुकुंदराव तापकीर यांनी गुरुवारी केले.

येथील सांगली अर्बन बँकेत सहकार भारती स्थापना दिनाचे औचित्य साधून लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे अनावरण डॉ. तापकीर यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, सहकार भारतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर चौगुले, जिल्हाध्यक्ष महेश हिंगमिरे, नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर जाधव, भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते.तापकीर म्हणाले की, विनासंस्कार, नही सहकार या ब्रीदवाक्याप्रमाणे सहकार भारतीचे काम सुरू आहे. सहकार चळवळ ब्रिटिशांनी सुरू केली असली तरी, स्वातंत्र्यानंतर वैकुंठराय मेहता, विठ्ठलराव विखे-पाटील, धनंजयराव गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी ही चळवळ वाढविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. सावकारी पाशातून शेतकरी, ग्रामीण जनतेची मुक्तता व्हावी, या उद्देशाने सहकार चळवळ उभारली गेली. ती महाराष्ट्रात खºयाअर्थाने विकसित झाली. पण १९७० च्या दशकात सहकार चळवळीत राजकारण शिरले. त्याचे विपरित परिणाम या चळवळीवर झाले. अशा काळात लक्ष्मणराव इनामदार यांनी सहकार भारतीची स्थापना करून या चळवळीला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांच्यामुळे या चळवळीला वेगळी दिशा मिळाली.इनामदार हे कुठल्याही संस्थेचे संचालक, अध्यक्ष झाले नाहीत. पडद्यामागे राहून काम करणाºया बिनचेहºयाच्या या माणसाने सहकारासाठी व्रतस्थ जीवन वेचले. ते कुठल्याही मोहपाशात अडकले नाहीत. त्यामुळेच आज सहकार भारतीचा मोठा विस्तार होऊ शकला. संस्थांमधील अडचणींचा अभ्यास करून शासनाला उपाय सुचविण्याचे काम सुरू आहे. सहकार भारतीने संशोधन केंद्रही सुरू केले आहे. सहकार चळवळ व्यापक व्हावी, यासाठी व्यावसायिक व्यवस्थापन व सामाजिक जाणिवेचे कार्यकर्ते तयार व्हावेत, यासाठी काम सुरू असल्याचे ते म्हणाले.सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी स्वागत करीत सहकार भारती व सांगली अर्बन बँकेचे नाते अतूट असून, ते कायम राहील, अशी ग्वाही दिली.सहकार भारतीचे प्रचारक भालचंद्र कुलकर्णी यांनी लक्ष्मणराव इनामदार यांच्या कार्याची माहिती दिली.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, संचालक संजय परमणे, रमेश भाकरे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे मुन्ना कुरणे, शरद नलावडे, शिरीष देशपांडे, नगरसेवक बाळासाहेब काकडे, माजी नगरसेवक प्रा. पद्माकर जगदाळे, हणमंत पवार, शैलेश तेलंग उपस्थित होते.सहकारातील : दुवादेशातील ४०० जिल्ह्यात सहकार भारतीचे काम सुरू आहे. आतापर्यंत ३५ हजार संचालक, अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले आहे. सहकारी संस्था व शासन यांच्यातील दुवा म्हणून सहकार भारती काम करीत आहेत.